Breaking News

दणक्यानंतर शहरातील प्रमुख राज्य महामार्गा वरील नालेसफाई जोरात सुरु

नगरपालिकेतर्फे पावसाळपूर्व नाले सफाईला प्रारंभ! मोठ्यांसह अनेक लहान नाल्यांची स्वच्छता; नागरिकांमध्ये समाधान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की नगरपालिके तर्फे पावसाळापूर्व नाल्यांची सफाई सुरू झाली आहे. शहरातील मोठ्या नाल्यांची जे.सी.बी.च्या सहाय्याने स्वच्छता करण्यात येत आहेत. नाला स्वच्छ केल्यानंतर राडा रोडा व गाळ नाल्याच्या काठावर न टाकता तो शहराबाहेर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना दुर्गंधीचा आणि डासांचा त्रास होणार नाही.


लहान नाल्यांची सफाई अंतिम टप्प्यात नगरपालिकेतर्फे शहरातील लहान नाल्यांची सफाई अगोदरच सुरू झाली आहे. नगरपालिकेतर्फे आरोग्य विभागातर्फे विभाग प्रमुख अरुण तोगे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी यांची नियुक्ती करून सफाई कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. लहान नाल्यांची सफाई अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोठ्या नाल्याला प्रारंभ शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई मोठ्या नाल्याला प्रारंभ पावसाळ्यापूर्वी शेवगाव नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी श्री संतोष लांडगे यांनी शहरातील अनेक प्रभागातील बंदिस्त गटावरील ढाके तुटल्याची सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी ते निविदा मागून बसून घ्यावेत अन्यथा यात लहान मुले बाबालवृद्ध पडून मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.

 

*ताजा कलम*

*शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई केल्यानंतर त्यांचा गाळ काठावर न लावता तो ट्रॅक्टरमध्ये भरून शहराबाहेर योग्य त्या ठिकाणी टाकण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या मा.मुख्यधिकारी संतोष लांडगे यांनी सांगितले. गाळ नाल्याच्या काठावरच लावला, तर पावसाळ्यात पुन्हा तो नाल्यात जाऊन पाण्याचा प्रवाह बंद होण्याची भिती आहे. त्यामुळे गाळ शहराबाहेर टाकण्यात येणार आहे. व्यापारी आणि नागरिक यांनी वापरलेले प्लास्टिक आणि टाकाऊ वस्तू नाल्यामध्ये न टाकता घंटागाडी मध्ये टाकावे अशी विनंती मा. प्रभारी मुख्याधिकारी यांनी केले आहे*

*क्रमशः*

*पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन करणारी रत्नप्रभा कंपनीचे संचालक श्री कुणाल शिंदे यांनी सांगितले नागरिकांनी सहकार्य केल्यास महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा आपले शहर स्वच्छ आणि सुंदर शहर हा पुरस्कार निश्चित शेवगाव नगरपरिषदेला मिळेल*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved