Breaking News

{ समस्या क्रमांक 03 } रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कोट्यावधींचा खर्च पाण्यात

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत देवटाकळी ते झोरापूर रस्त्यावर खर्च कोटींचा काम लाखात

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील दहेगाव गटातील देवटाकळी ते जोरापुर रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नद्या आणि ओढ्यांवरील पुल बांधणे रस्त्याचे डांबरीकरण करणे यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला परंतु कामाचे ठेकेदार देशमुख कन्स्ट्रक्शन सोलापूर यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि रस्त्याचे काम केल्या असून वास्तविक पाहता जुना संपूर्ण रस्ता जे.सी.बी. आणि पोकलेन ने खांदून त्यावर चार ते पाच लेअर चे काम होणे अपेक्षित होते‌.

 

परंतु खराटेने धुवून साफ करून डायरेक्ट हॉट मिक्सर चालून डांबर अंथरण्याचे काम सोलापूर येथील देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीने केले असून याकडे तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्याचे खासदार यांनी साप दुर्लक्ष केले आहे संबंधित काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सामाजिक कार्यकर्ते आप शेटे यांनी अहमदनगरच्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग व पंतप्रधान सडक योजनेच्या मुख्य कार्यालय मध्ये माहितीच्या अधिकारात सदरच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविषयी रीतसर माहिती मागविले आहे संबंधित खात्याचे अधिकारी पवार साहेब यांनी कामाची निश्चित चौकशी केली जाईल अशी आश्वासन दिले.

तत्कालीन आमदार आणि खासदार यांनी मोठ्या थाटात भूमिपूजन समारंभ शेकडो कार्यकर्त्यांचे उपस्थितीत पार पाडला परंतु त्या कामाचे पुढे काय झाले याकडे कोणाचेही लक्ष नाही संबंधित कामाची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक क्वालिटी कंट्रोल च्या मार्फत सखोल चौकशी केल्यास संबंधित ठेकेदाराची बिल रोखू शकता येते पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ???

*ताजा कलम*

*शेवगाव तालुक्यातील अनेक विकास कामांमध्ये टक्केवारीचा खेळ होत असल्याने कामाच्या दर्जाबाबत न संबंधित विभागातील नेत्यांची तक्रार असते ना कार्यकर्त्यांची तक्रार असते शेवगाव तालुक्याला कोणीही या आणि टिकली लावून जा असा कार्यक्रम सुरू आहे जबाबदार कोण???*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved