Breaking News

शिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ – रंजना जोब

स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत उन्हाळी शिबिराचा समारोप

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)- पालकांनी आपल्या मुलांना ग्रीष्मकालीन शिबिराकरिता कुठलाही विचार न करता पाठविणे गरजेचे आहे. कारण शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होत असतो. म्हणून शिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्या श्रीमती रंजना जोब यांनी केले.
त्या श्री दत्ता मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था व्दारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स खात रोड खोकरला येथील उन्हाळी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.

ग्रीष्मकालीन शिबिर स्कूल ऑफ स्कॉलर्स चे संचालक रामबिलास सारडा व स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना आंबोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्या श्रीमती रंजना जोब होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना आंबोलकर, श्री निकेश खेताडे, कु. अंकिता खोब्रागडे उपस्थित होत्या.

मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेश व सरवस्तीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शिबिरादरम्यान स्केटिंग कौशल्य निकेश खेताडे, झुंबा अंकिता खोब्रागडे, कराटे गणेश साकुरे, नृत्य प्रणित उके, हरेश डेकाटे, कोमल उके, संगीत संदीप हांडे, आर्ट अँड क्राफ्ट जयश्री खादाडे, शमिका निनावे, सुंदर हस्तलेखन कौशल्य हेमंत मेश्राम, सौ. दीप्ती बिसेन, सौ. संध्या बोरकर, वाचन व सामान्य ज्ञान सौ. वैशाली बनकर, शितल कोल्हाडे, खेळ सौ. सुषमा सूर्यवंशी, सौ. वंदना मदनकर, बोधकथा सौ. दिपाली सोनकुसरे, अपर्ना सिंगाडे, फायरलेस कुकिंग संपदा खटी, अर्चना सार्वे, शिल्पा बसवारे, उर्मिला पंचभाई, व्यक्तीमत्व विकास वर व्याख्यान डॉ. अशोक पत्की इत्यादी मान्यवरांनी विद्यार्थी- विद्यार्थिनींचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिबिरा मागील उद्देश होता. यात अनेक कृती (activity) घेण्यात आल्या. शिबिरात पूर्व प्राथमिक ते वर्ग ९ वर्गातील जवळपास २२६ विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. उन्हाळी शिबिरात घेण्यात आलेला विविध कृतींचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिरा दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणात उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून अधिरा सार्वे, अभीर लांबट, तक्ष कुंभारे, गार्गी चकोले यांना ताज, तसेच उत्कृष्ट उपक्रमात प्राविण्य प्राप्त अर्नव वडेकर, जानकी पाटील यांचा गुणगौरव आणि त्या विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थी – विद्यार्थ्यींनींनी प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिष डेकाटे व प्रास्ताविक वंदना मदनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुषमा सुर्यवंशी यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता स्कूल ऑफ स्कॉलर्स येथील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved