Breaking News

सरस्वती जय रामजी तर्वेकर महिला महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख -नागभीड 

नागभीड :-दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती सरस्वती जय रामजी तर्वेकर महिला महाविद्यालय येथे साजरी करण्यात आली प्रस्तुत कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रेखा नरेंद्र जिभकाटे उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी अनेक भाषणे झाली अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रेखा जिभ काटे यांनी डॉक्टर आंबेडकर हे महामानव होते त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक संकटाला सामोरे जाऊन परिस्थितीतून मार्ग काढण्याचे अजीब कौशल्य दाखवून विविध क्षेत्रातील अनेक प्रकारच्या डिगऱ्या प्राप्त केल्या व समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींसाठी अनेक मोलाचे योगदान करणारे कार्य केले.

विद्यार्थ्यांसाठी शिका आणि संघटित व्हा तसेच वाचाल तर वाचाल इत्यादी म्हणींच्या माध्यमातून संपूर्ण जीवनच एक चालते बोलते विद्यापीठ असल्याचा दाखला दिला अशाप्रकारे डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातून सर्वांनाच बरेच काही शिकण्यासारखे आहे असे नमूद केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती कार्यक्रमाचे संचालन बनसोड सर यांनी केले याप्रसंगी अनेक भीम गीताचे सादरीकरण झाले प्राध्यापक रोशन गेडाम सर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा वृत्तांत सादर केला कार्यक्रमासाठी प्राध्यापक शुभांगी पोहेकर संगीता नारनवरे प्रभाकर सावरकर व अन्य शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक बोरसे सर यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved