Breaking News

बाबा जुमदेवजी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करा

नागपुरातील कळमना पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर:-भंडारा येथील मोहाडी मध्ये बागेश्वर धामचे महाराज धिरेंद्र शास्त्री यांचा 28 मार्च पासून प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे. याच कार्यक्रमामध्ये दिनांक 29 मार्च रोजी धिरेंद्र शास्त्री यांनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करीत असताना महानत्यागी बाबा जूमदेवजी यांचे विचार व कार्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली ज्यामुळे देशभरातील परमात्मा एक सेवकांच्या भावना दुखावल्या असल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात परमात्मा एक सेवकांनी रस्त्यावर उतरुन तसेच पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवून धिरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

धिरेंद्र शास्त्री यांनी बाबा जुमदेवजी यांचा उल्लेख करीत म्हंटले की, “जे राम करीत नाही त्यांचे पूर्वज तर नरकात आहेतच, पण तुम्ही व येणारी पिढी नरकात जाईल. त्याचबरोबर परमात्मा एक मार्गात आई वडिलांना मानत नाही, तो हनुमान भक्त होऊ शकत नाही. असे बोलत बाबा जुमदेवजी यांचा धर्माचा अप्रचार धिरेंद्र शास्त्री यांनी केला.धिरेंद्र शास्त्री यांचा वक्तव्याचा परमात्मा एक सेवक यांच्याकडून निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी नागपूर शहरातील कळमना पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved