Breaking News

रोहयो मजूर मजूरीपासून वंचित

* मजुरा़ंची रोहयो कामाकडे पाठ *

* रोजगार हमी योजनेचा वाजला बोजवारा *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-१९७२ ला भयानक दुष्काळीवर मात करूण लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या संकल्पणेतुन रोजगार हमी योजना साकारण्यात आली.वसंतराव नाईक हेच रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.रोजगार हमी योजने अंतर्गत शासन प्रति कुटुंब १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देते त्याचप्रमाणे निधी सूद्धा उपलब्ध करून देते.चिमूर तालुका अंतर्गत रोजगार हमी योजनेचे अनेक कामे सुरू आहेत. कुशल व अकुशल कामे त्याचप्रमाणे वैयक्तिक व सार्वजनिक कामे सुरू आहेत.

परंतु चिमूर तालुक्यातील मजुरांच्या खात्यात तिन महिन्यांपासून एक रुपया सुद्धा जमा न झाल्याने रोजगार हमी योजनेच्या हजारो मजुरांना मजूरी पासुन वंचित ठेवण्यात आले आहे.डिसेबर २०२३ पासुन मजूरी खात्यामध्ये जमा होणे बंद असल्याने मजुरांनी कामाकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतमधील अनेक महत्वपूर्ण कामे रखडली असल्याने गाव विकासापासून वंचित राहत आहे. तिन महिन्यांपासून मजुरांच्या खात्यात पैसे न जमा झाल्याने मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत आहे.तातडीने मजुरांच्या खात्यात पैसे जमा करण्याची मागणी मजुरांकडून करण्यात येत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved