Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या गोंदिया आणि नागपूर जिल्हा दौरा

प्रतिनिधी – नागपूर

नागपूर दि.१०:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.सकाळी दहा वाजता गोंदिया विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी दहा वाजून 55 मिनिटांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती. सकाळी 11 वाजता उपराष्ट्रपती महोदयांसमवेत डीबी सायन्स कॉलेज गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता उपराष्ट्रपती महोदयासमवेत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व नामवंत व्यक्तींना सुवर्णपदक पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. दुपारी १ वाजता उपराष्ट्रपती महोदयासमवेत मोटारीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदियाकडे प्रयाण. दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती.

दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी मोटारीने गोंदिया विमानतळाकडे प्रयाण. दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी गोंदिया विमानतळ येथे आगमन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने रामगिरी निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी तीन वाजून २० मिनिटांनी रामगिरी निवासस्थान येथे आगमन व राखीव. सायंकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी मोटारीने रामटेककडे प्रयाण. सायंकाळी सहा वाजता नेहरू मैदान रामटेक येथील शिव संकल्प अभियान कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती. सायंकाळी साडेसात वाजता मोटारीने नागपूर विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी नागपूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved