Breaking News

दहेगाव येथील शेतकऱ्यांना पिक विमा तत्काळ मिळावा

तालुका कृषी अधिकारी राळेगांव , नायब तहसीलदार राळेगाव यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ

यवतमाळ:-राळेगांव तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्यांनी विमा कंपनीस पिक विमा भरलेला असून तो तत्काळ योग्य नुकसानीसह मिळावा अशी मागणी दहेगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग राळेगांव,नायब तहसीलदार राळेगाव यांच्याकडे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी व खराब हवामानामुळे दहेगाव येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेले सोयाबीन कापूस तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान होऊन हाती काही आलेले नाही.


आज पर्यंत ज्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाले नाही त्यांना योग्य रक्कम देण्यात यावी. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांचा अंत न पाहता पीक विमा मिळावा अन्यथा शेतकरी उद्रेक करतील दहेगाव शेजारील गावातील आठ ते दहा शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला परंतु दहेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचा सर्वे झाले. असता अजूनपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांना सदर पिक विमा मिळाला नाही. तरी सदर प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे.यावेळी अभिषेक जिवतोडे, विठ्ठल जिवतोडे,हर्षल काळे,सचिन दातारकर, सचिन जिवतोडे,विठ्ठल झाडे, अरविंद कुबडे, राहुल रोकडे, त्र्यंबक झाडे समस्त दहेगाव येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved