Breaking News

१८ व्या राज्यस्तरिय आष्टेडु आखाडा स्पर्धेत वरो-यातील विद्यार्थ्यांचे सुयश

सात गोल्ड, दोन सिल्व्हर व एक ब्रांझ मेडल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-३० सप्टेबर ते २ आॕक्टोबर २०२३ ला अमरावतीच्या डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अमरावती जिल्हा आष्टेडु आखाडा असोसिएशन व डाॕ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय उत्तम नगर अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या राज्यस्तरीय आष्टेडु आखाडा स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत वरोरा यांच्या फौजी वाॕरिअर्स च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केलेले आहे .

रितिक धवने , सानिया आवारी , पियुष विंधाने , वेदिका भोयर , शंतनु ढवने , सोनू निखोडे , फकीरा निखाडे या सात विद्यार्थ्यांनी गोल्डमेडल तर पद्मश्री झुरळे व शोन दसूडे या दोघांनी सिल्व्हर तर वेदांत अतकळे याला ब्रांझ मेडल मिळालेले आहे . फौजी वाॕरिअर्स मार्शल आर्टस् व आष्टेडु आखाडा स्पर्धेत सातत्याने वरो-याचे नाव केवळ राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रिय स्पर्धेतही सातत्याने मोठं करत आहे . सदभावना चौकातील इंदीरा गांधी शाळेच्या आवारात हे सर्व विद्यार्थी गुरु राजु नकवे , प्रविण चिमुरकर , डी. ऐन. खापने , रवी चरुरकर व रविंद्र तुरानकर , अश्विनी नरड यांच्या मार्गदर्शनात कसून सराव करतात . या सर्व विद्यार्थ्यांवर वरोरावासियांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे .

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved