Breaking News

लेखक भानुदास पोपटे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ’ या ग्रंथावर चर्चासत्राचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व लेखक भानुदास पोपटे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी चळवळीला दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ’ हा ग्रंथ अलिकडेच प्रकाशित झाला आहे.या ग्रंथाच्या माध्यमातून लेखक भानुदास पोपटे यांनी दुर्लक्षित कार्यकर्त्यांच्या अलिखित संदर्भाना अर्थ प्राप्त करुन दिला आहे.ऐतिहासिक दस्तावेज व संदर्भग्रंथ म्हणून चळवळीच्या दृष्टीने या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.या ग्रंथावर चर्चासत्राचे आयोजन आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी, चंद्रपूर या साहित्य,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत संस्थेतर्फे रविवार, दिनांक २४ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता मृणालगिरी सेलिब्रेशन, खोब्रागडे कॉम्प्लेक्स, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

चर्चासत्राचे उदघाटन आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. मेश्राम करणार असून अध्यक्षस्थान प्रसिद्ध लेखक तथा विचारवंत फुलचंद खोब्रागडे भूषवणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून देशक खोब्रागडे, लेखक भानुदास पोपटे उपस्थित राहणार आहेत.ग्रंथावर अभ्यासक डॉ.प्रसेन ताकसांडे,डॉ.प्रफुल राजूरवाडे, कोमल खोब्रागडे भाष्य करणार आहेत.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आंबेडकरी साहित्य प्रबोधिनीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved