Breaking News

चिमूरातून शेकडो ओबीसी बांधव जाणार

चंद्रपुरात रविवारला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा महामोर्चा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-मराठा समाज आरक्षणाकरिता कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आक्रमक झाला असतांना.ओबीस समाज सुद्धा आक्रमक झाला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ओबीसी समाजाच्या कोट्यातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाच्या विरोध नाही पण ओबीसी समाजाच्या कोट्याला धक्का न लागता आरक्षण देण्यात यावे अशी ओबीसी समाजाची मागणी आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रविंद्र टोंगे ओबीसी समाजावरिल अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शासनाच्या विरोधात चंद्रपुरात उपोषणाला बसले आहे.चिमूर तालुक्यातील ओबीसी बांधवांनी ओबीसी कोट्यातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला होता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. बबनरावजी तायवाडे यांच्या नेतृत्वात १७ सप्टेंबर रविवारला १२.०० वाजता महामोर्चा निघणार आहे. महामोर्चा गांधी चौक मार्गे निघुन जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये संपणार आहे.

या महामोर्चा ला चिमूरातून शेकडो ओबीसी बांधव चंद्रपूर ला निघणार आहे.चिमुरातील ओबीसी बांधवांनी महामोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मारोतराव अतकरे, रामदास कामडी,कवडू लोहकरे, श्रीहरी सातपुते,प्रा.राम राऊत , विलास पिसे प्रभाकरराव लोथे, प्रभाकर पिसे, रामभाऊ खडसिंगे,राजू लोणारे , अविनाश अगडे , किर्ती रोकडे, रविंद्र उरकुडे, राजेंद्र शेंडे ,अक्षय लांजेवार, धर्मदास पानसे, रामकृष्ण जिल्हारे, पुष्पा हरणे , लता पिसे, ममता डुकरे ,भावना बावणकर , प्रज्वला गावंडे , माधूरी रेवतकर, मिनाक्षी बंडे ,सविता चौधरी,यामीनी कामडी, पटवारी कोहपरे, ताराचंद बोरकुटे, विनायक हजारे, अशोक विभुते, आदींनी केले आहे.*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved