Breaking News

प्रकाश कोडापे झाडी शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-येथील कवी प्रकाश कोडापे यांना झाडीबोली साहित्य मंडळद्वारा देण्यात येणारा झाडी शब्दसाधक पुरस्कार आनंदवन येथील संधी निकेतनच्या निजबल सभागृहात आयोजित समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून महारोगी सेवा समिती, आनंदवनचे सचिव डॉ.विकास आमटे, प्रसिद्ध नाट्यकलावंत पद्मश्री डॉ.परशुराम खुणे,आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू,ज्येष्ठ साहित्यिक ना.गो.थुटे, कवयित्री रत्नमाला भोयर,कवी अरुण झगडकर,पंडित लोंढे आदी उपस्थित होते.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, मानवस्त्र देऊन अतिथीच्या हस्ते प्रकाश कोडापे यांना गौरविण्यात आले.

प्रकाश कोडापे चिमूर पं. स. अंतर्गत जि. प. प्रा. शाळा, सोनेगाव(बे.)येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांचा संघर्ष हा काव्यसंग्रह प्रकाशित असून अनेक वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. झाडीबोली साहित्य मंडळ,चिमूरचे ते सचिव आहेत. मंडळातर्फे विविध साहित्यविषयक उपक्रम राबविण्यात येतात.कोडापे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना झाडीबोली साहित्य मंडळ, चंद्रपूर जिल्हा शाखेने झाडी शब्दसाधक पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचे झाडीबोली साहित्य मंडळ चिमूरच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved