जिल्ह्यातील वडकी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ/राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील वडकी येथुन आज दि 5 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रेचा प्रारंभ झाला. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवकांचे जगणे कठीण झाल्यामुळे भाजप सरकारचा भांडाफोड करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन काँग्रेस पक्ष जनतेशी संवाद साधणार अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

या संवाद यात्रेला उपस्थित माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, अँड प्रफुल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ, अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रविण कोकाटे माजी सभापती पंचायत समिती, राजेंद्र तेलंगे तालुकाध्यक्ष , प्रदीप ठुणे राळेगाव शहर अध्यक्ष, डॉ नरेंद्र इंगोले माजी सरपंच वडकी अंकुश मुनेश्वर कृ. बा. समिती सदस्य राळेगाव अशोक काचोळे,प्रकाश पोपट,तसेच तालुक्यातील सर्व मान्यवर नेते व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नंतर जनसंवाद यात्रा राळेगाव कडे भारत जोडो घोषणा देत रवाना झाली व राळेगाव मध्ये जाताच रावेरी पॉईंट पासून पदयात्रा सुरू होऊन क्रांती चौक बस स्टँड जवळ असलेल्या बिरसा मुंडा पुतळ्याजवळ जनसंवाद यात्रेची सांगता करण्यात आली.
ज्वाला समाचार सच का सामना