सामूहिक रजा आंदोलनाने काय होणार? – पालकवर्गाचा सवाल
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ/राळेगाव:-दिनांक 5/ 9/ 2023 रोजी शिक्षक दिन असून याच दिवशी असंख्य शिक्षकांचे शासनाच्या उदासीन , शिक्षकांवर लादलेले अशैक्षणिक कामे, त्यात निरक्षर सर्वेक्षण, विविध अँप वर भरावी लागणारी माहिती शिक्षण विभागा व्यतिरिक्त इतर विभागांच्या मोहिमांची जनजागृती कामातून शिक्षकांना पूर्णपणे मुक्त करा. फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ने केली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक दिनी 5 सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. शासन एकीकडे शिक्षकांना शैक्षणिक कामात गुंतवत आहेत व दुसरीकडे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मागत आहेत. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरणे, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणे, सर्व शिक्षकांना निवड श्रेणी लागू करणे, शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, पगार एक तारखेला करण्यात यावा यासह विविध मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्याची पूर्तता करावी अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात येत आहे.
आम्हाला फक्त शिकवू द्या या प्रमुख मागणी सह आम्हाला शिक्षक या मूळ नियुक्ती वर काम करून द्या, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊ द्या, याकरिता राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा राळेगाव सदर सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आणि बहुसंख्येने शिक्षक मंडळी या आंदोलनात सहभागी झाले.अश्या रजा आंदोलन केल्याने काहीही साध्य होणार नाही पण शाळकरी मुलांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या मागण्या बरोबर आहे त्या मान्य सुद्धा झाल्या पाहिजे असा सूर पालकवर्गातून येत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना