जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे – हल्ली सायबर गुन्हेगार लोकांना लुबाडण्याचे नवनवीन प्रकार शोधत आहेत. त्यात नविन प्रकार म्हणजे बनावट ई-चलन होय. जर आपण वाहन चालवितांना आरटीओ विभागाच्या नियमांचे उल्लंघन केले असेल तर सायबर गुन्हेगार हे तुम्हाला बनावट मॅसेज पाठवतात आणि त्यात लिहिलेले असते की तुम्ही ट्रॅफीक नियमांचे उल्लंघन केले आहे व तुम्हाला योग्य तो दंड भरावे लागेल आणि सदरील मॅसेज मध्ये बनावट लिंकचा देखील समावेश असतो त्या लिंकवर क्लिक करताच एक बनावट वेबसाईट ओपन होते आणि असे केल्याने सामान्य माणसाचे बँक अकाउंट हॅक होवू शकते किंवा ते बँक अकाउंट रिकामे देखील होवू शकते.
म्हणून नागरीकांनी लिंक ओपन करण्याअगोदर खात्री करावी की ती लिंक किंवा वेबसाईट अधिकृत आहे किंवा नाही याची खात्री करावी. परिवहन विभागाची अधिकृत वेबसाईट https://echallan.parivahan.gov.in / हीच आहे. या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही लिंक जर तुम्हाला येत असेल तर नागरीकांना त्या लिंकला क्लिक करु नये, म्हणून अशा प्रकारच्या बनावट लिंक आल्या असतील तर तुम्ही संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावून त्यासंबंधी खात्री करुन घ्या त्यानंतरच पुढचे पाऊल उचला. जर आपण ई चलन भरतांना व्यवहार करत असतांना संपुर्ण सुरक्षितता बाळगा तसेच आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना