जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-ग्रामगीता महाविद्यालय चिमूर व चरित्र नाट्य अकादमी चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सणानिमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये प्रशिक्षक भावाने बांधली प्रशिक्षण घेणाऱ्या बहिणीना राखी बांधत वर्षानुवर्ष सुरू असलेले परंपरेला छेद देत नवीन पायंडा रोवला आहे. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा प्रसिद्ध सण आहे रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नात्याचे बंधन राखी सामान्यात बहीण भावाला बांधतात. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्याला भावाच्या प्रगतीसाठी मनोकामना व्यक्त करते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षण करण्याचे वचन देतो भाऊ आपल्या बहिणींना काही भेटवस्तू देतो भारतीय परंपरेनुसार अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो परंतु ग्रामगीता महाविद्यालय चिमूर व चरित्र नाट्य अकादमी चिमूर चे प्रशिक्षक सचिन भरडे यांच्या संकल्पनेतून एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
ज्वाला समाचार सच का सामना