सावलीचे माजी उपसरपंच भुषण झाडे यांची मागणी
वर्धा -सुरज गुळघाने
वर्धा:-बँक शेतकऱ्यांना कृषी कर्ज देत आहे परंतु तुम्ही सातबाऱ्यावर बोझा चढवून आना तरच बँक शेतकऱ्यांना कर्ज देते मात्र आता जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धत आली असून याचा फटका सर्वसाधारण शेतकऱ्यांना बसला आहे.फेरफार ऑनलाईन टाकल्यावर पटवारी मात्र 8 ते 10दिवस झाल्यावर फेरफार वापस करतो व तुम्ही पुन्हा ऑनलाईन करा तुमच बोझाच पत्र बरोबर दिसत नाही अगोदरच 10 दिवस उलटून जाते व पुन्हा मात्र 20 दिवस फेरफार साठी लागतात.10 दिवसांनी फेरफार वापस करण्याचा कुठला आदेश आहे का असा प्रश्न सर्वसाधारण शेतकऱ्याला पडला आहे. तरोडा साझा मध्ये हा प्रकार चांगल्या प्रकारे चालु असून जिल्हा प्रशासन यांच्या मुसक्या आवळणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना