Breaking News

बल्लारपूर येथे ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 21 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, चंद्रपूरच्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे संत रोहिदास समाज भवन, बल्लारपूर शहरातील रवींद्र नगर व गणपती वार्ड येथे लिडकॉम आपल्या दारी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक विजयालक्ष्मी मनीरत्न यांच्यासह शिवकुमार बांगडे, अनिल बांगडे, शामराव लिपटे, महादेव खंडाळे, वसंता दाहेदर, शंकर जोगे तसेच मोठ्या संख्येने चर्मकार बांधव उपस्थित होते.

“शासन आपल्या दारी” या संकल्पनेतून महामंडळातर्फे लिडकॉम आपल्या दारी हा मेळावा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला. महामंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून जास्तीत-जास्त लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचाव्यात हा उद्देश ठेवून हा मेळावा घेण्यात आला.

यावेळी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक विजयालक्ष्मी मनीरत्न यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित चर्मकार बांधवांना दिली. चर्मकार समाज व्यवसायात यावा, या समाजातून यशस्वी व्यावसायिक घडावे, यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरीकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved