Breaking News

शिक्षकांचा आर्त टाहो “आम्हाला शिकवू द्या”

विविध परीक्षा,सर्वेक्षण, अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा वैताग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-नवीन शैक्षणिक सत्र सुरु झाल्याबरोबर १जुलै ते २० जुलै सेतू अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमाची पूर्वचाचणी नंतर उत्तर चाचणी,१७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान पायाभूत चाचणी व त्याचा निकाल हे संपत नाही तर १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत निरक्षर सर्वेक्षण,शाळाबाह्य विद्यार्थी सर्व्हेक्षण अशा विविध अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक वैतागून गेले आहेत.सारखे अहवाल मागणे, लिंकवर माहिती भरणे यामुळे “आम्हाला शिकवू द्या”अशी आर्त हाक शिक्षक देत आहेत.शाळा सुरु होऊनही या सर्व अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना अभ्यासक्रम कधी शिकवायचा हा प्रश्न पडला आहे.

चालू सत्रात आतापर्यंत तीन वेगवेगळ्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या घेण्यात आल्या.परीक्षा घेण्यापेक्षा त्याचा अहवाल केंद्रप्रमुख ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणे यातच शिक्षकांचा वेळ अधिक जात आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी हा प्रश्न निर्माण झाला आहे. डायट, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विद्या प्राधिकरण, समग्र शिक्षा अभियान यांचेकडून विविध उपक्रमांचा भडीमार होत आहे. रोज नवनवीन पत्र व्हाट्सअँपवर येऊन धडकतात. तात्काळ,अतिमहत्वाचे या नावाखाली माहिती मागण्यासाठी शिक्षकांना जेरीस धरल्या जात आहे.या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे.

शासन शिक्षकांना ऑनलाईन कामे करायला सांगत असताना शासनाने मोबाईल, इंटरनेट शाळांना उपलब्ध करुन दिला नाही. ऑनलाईन कामे करण्यासाठी कोणताही डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमला नाही. तरी शिक्षक ऑनलाईनची ही कामे करीत असतात.ऑनलाईन कामे आणि अशैक्षणिक कामे यामुळे शिक्षकांना अध्यापन कार्यात प्रचंड खोळंबा होत आहे. मुख्याध्यापक यांना विविध शालेय कामाकरिता वारंवार बाहेर जावे लागते.अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर ठेवण्यास बाध्य करुन विदयार्थ्यांच्या अध्यापनाकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करुन जिल्हा परिषद शाळांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे दिसून येते.

………………………………………..

विविध अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक पुरता बेजार झाला आहे.रोज नवनवीन उपक्रमाची पत्र,अशैक्षणिक कामे,सर्वेक्षण,विविध परीक्षा त्यांचे ऑफलाईन अहवाल,ऑनलाईन लिंक यामुळे अध्यापन कधी करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.’आम्हाला फक्त शिकवू द्या’ ही शिक्षकांची मागणी आहे.
सुरेश डांगे, विभागीय सरचिटणीस, शिक्षक भारती नागपूर विभाग

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved