Breaking News

शेवगांव पोलिसांची दबंग कारवाई तालुक्याच्या पश्चिम भागात सामनगाव शिवारात सैराट अवैध वाळु वाहणारांवर दोन दिवसांपूर्वी पहाटे मोठी कारवाई

विशेष प्रतिनिधी – अविनाश देशमुख शेवगांव

शेवगाव:-तालुक्यातील सामनगाव शिवारात सारपे वस्ती जवळ विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदा केलेला ५८ ब्रास वाळूचा साठा व विना नंबरचे ३ डंपर , ३ ट्रॅक्टर ट्रॉली , दोन मोटरसायकली एक स्कार्पिओ गाडी , एक जेसीबी , असा एकूण ६७ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शेवगाव पोलिस पथकाने धडक कारवाई करत जप्त करुन पाच जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या वेळी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून इतर तिघे फरार झाले आहेत . उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील व परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांना गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पोलीस पथक तयार करून सोमवारी 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या तीन च्या सुमारास सामानगावच्या शिवारात सारपे वस्ती परिसरात छापा टाकून ही कारवाई केली.

याबाबत लाला तमीज शेख (वय ३८ ) व ऋषिकेश अर्जुन आहेर दोघे राहणार भातकुडगाव .अशा दोघा संशयतांना ताब्यात घेण्यात आले .तर गोकुळ आठरे , सचिन विठ्ठल तोगे राहणार भातकुडगाव व नागेश बडधे राहणार जोहरापूर हे फरार झाले आहेत, या प्रसंगी पोलीस पथक शासकीय काम करत असताना यातील संशयित आरोपी लाला तमीज शेख राहणार भातकुडगाव याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच १२ एन जी २७९२ पोलीस पथकाच्या अंगावर घालून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने व .तेथून त्यांना पळून जाता यावे या उद्देशाने अंगावर घालण्याचा प्रयत्न केला . त्यावेळी पोलिसांनी बाजूला होऊन जीव वाचविला . असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे .याबाबत वरील पाचही संशयित आरोपीवर शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभाकर गलधर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भादवी कलम ३०७ ,३५३, ३७९ , ३४ पर्यावरण संरक्षण अधिनियम १५, ३ खाण व खनिज अधिनियम २१,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*ताजा कलम*

*काही सराईत वाळु चोर जिल्यातून हद्दपार असलेले व पश्चिम भागातील वजनदार यां धंद्यात जोमात आहेत शेवगांव पोलीस त्यांना लवकरच निश्चित कोमात घातल्याशिवाय राहणार नाहीत महसुल आणि पोलीस खात्यातील काही उंदीर त्यांना मदत करत आहेत ते “घर का भेंदि लंका ढाये” कोण आहेत??? याचा कसुन शोध सुरु असुन त्यांची पार पीपाणी झाली आहे याना राजाश्रय कोणाचा आहे हा सुद्धा संशोधनाचा विषाय आहे* काही तर मी नाही त्यातली आणि वाळु चोरा नदीतली सर्रास धंदा सुरु आहे

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रका*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved