अँटी करप्शन ब्युरो अमरावती ची राळेगावात धडक कारवाई
जिल्हा प्रतिनिधी :शशिम कांबळे
यवतमाळ:-यवतमाळ जिल्हा अंतर्गत येत असलेल्या राळेगाव तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी या पदावर असलेले शिशिर एकनाथ निनावे यांनी दिनांक 08/08/2023 रोजी पडताळणी कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष तक्रारदार यांना त्यांच्या बहिणीच्या नावे शेतीचा फेरफार करून देण्यासाठी तळजोडी अंति 3000/- रुपये लाचेची मागणी केली व आज दिनांक 08/08/2023 रोजी सापळा कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष लाच रक्कम एम.एस. ई. बी. कार्यालय राळेगाव समोर स्वीकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन राळेगाव येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास चालू आहे.

सदरची कार्यवाही माननीय मारुती जगताप, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती, परिक्षेत्र अमरावती, देवीदास घेवरे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे आणि अंमलदार निलेश पखाले, जयंत ब्राह्मणकर, अतुल माले, सचिन भोयर, राहुल गेडाम, राकेश सावसागडे, सुरज मेश्राम व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केले.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयात मोबाईल क्रमांक 7722002555 किंवा दूरध्वनी क्रमांक 07232-244002 तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना