जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-गांधी सेवा शिक्षण समिती व्दारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अश्विन एम.चंदेल यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० जनजागृती सप्ताह २४ ते २९ जुलै शनिवार पर्यत साजरा करण्यात आला.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आखण्यात आले. कौशल्य आधारित शिक्षण हे धोरणाचे प्रमुख उद्दीष्ठ आहे. तब्बल ३४ वर्षानी येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक बदल घडवून आणणारे आहे. या धोरणाची विभागणी ही शालेय शिक्षण उच्चशिक्षण भाषा तंत्रज्ञान अर्थ अशाप्रकारे केली असुन अभ्यासक्रम व अध्ययन पद्धतीतील बदलासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यामध्ये देण्यात आली आहे. रोजगारक्षम कौशल्य विकास या धोरणाचा पाया असून शिष्यवृत्तीसह बहुभाषिकता व्यावसायीक विकास संधी संशोधन व गुणवत्ता विकास आदी बाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.
नविन शिक्षण प्रणाली विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.राष्ट्रीय शैक्षणीक धोरण विषयावर बुधवारला निबंध स्पर्धा घेण्यात आली. शुक्रवारला ऑनलाईन प्रश्नमंजुषा परिक्षा व मान्यवरांचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. एच टी गजभिये, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.आशुतोष एम पोपटे, एनएसएस विभागीय समन्वयक व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पि व्हि पिसे यांनी सत्र २०२४-२०२५ मध्ये जे विद्यार्थी नव्या राष्ट्रीय धोरण अंतर्गत प्रवेश घेणार आहेत त्यांना उपलब्ध असलेल्या संधी अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले. शनिवारला या सप्ताहाचा समारोप करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल बनसोड, डॉ. हरेश गजभिये, प्रा. पिसे, प्रा. कुमरे, प्रा. ठवरे, प्रा. पोपटे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धक विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
ज्वाला समाचार सच का सामना