Breaking News

अकरा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून परिवाराचे सांत्वन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील चिंधी (माल) येथील एका लहान मुलीला एका विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. कु. अप्सरा विलास सुतार अंदाजे ४:०० वाजताच्या सुमारास गाढ झोपेत असतांना तिला सर्पदंश झाला परंतु त्या वेळी तिला आपल्याला सर्पदंश झाले हे कळले नाही नंतर तिला खाटेवर काहीतरी आहे असे भास होताच तिला साप दिसला त्यावेळी अप्सरा सोबत आजी व भाऊ झोपलेले होते.

तिने आजीला साप चावेल या दृष्टीने आजीला खाटेवर साप असल्याचे सांगितले व उठवलं. काही वेळानंतर मुलीची प्रकृती अचानक बिघडत असल्याने, सर्पदंश झाले असे लक्षात आले असता तिला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे नेण्यात आले. प्रकृतीत सुधारणा नसल्याने तिला तात्काळ ब्रम्हपुरी येथे नेत असतांना अप्सराची प्राण जोत मालवली. एवढ्या कमी वयात तिच्या जाण्याने परिवारात व गावात शोककाळा पसरली.

ही बाब उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतिशभाऊ वारजूकर हे चंद्रपूर दौऱ्यावर असतांना चिंधी (माल) येथील आशिष भाकरे यांनी घटनेची माहिती दिली असता भाऊंनी त्वरित चिंधी (माल) येथे जाऊन परिवाराची भेट घेऊन घटनेची माहिती घेऊन परिवाराचे सांत्वन केले व आर्थिक मदत दिली. यावेळी चिमूर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष रोशनभाऊ ढोक, माजी नगरसेवक प्रतीक भसिन, माजी नगरसेवक संजय अमृतकर, विलास येलशेटीवार,आशिष भाकरे,गिरीधर नन्नावरे, विकास सुतार, अरविंद सुतार, सुरज तिवस्कर, देवा सुतार,बळीराम माहुरे,,सदानंद तांदूळकर,सोमेश्वर माहुरे व गावकरी उपस्थित होते‌.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved