Breaking News

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने केळापुर तहसीलदार यांना निवेदन

एकाच वेळी पत्रकार संघ,कामगार संघ.शेतकरी संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-मंगळवार दिनांक १८/०७/२०२३ रोजी केळापुर येथील तहसीलदार इंगळे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या आदेशनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याच्यां आव्हानाचे पालन करून यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे, के के चव्हाण जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अनिल पुल्लजवार यांनी केळापुर तालुक्यातील संपुर्ण पत्रकार संघाचे. कामगार संघाचे.

शेतकरी संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांच्या उपस्थतीमध्ये आज रोजी इंगळे तहसिलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्रकारावर सतत होत असलेल्या अन्याय अत्याचार अश्या अनेक पत्रकारांच्या समस्या व प्रश्न शासनाने सोडवावित तसेच पत्रकार बांधवावर प्रशासनाचे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून पत्रकारांवरती ३५३ सारखे खोट्या गुन्ह्यात अडकावून दपडशाही करुन पत्रकराचा आवाज दाबाण्याच काम दिवसाने दिवस मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्यांमुळे शासनाने तात्काळ दखल घेवून पत्रकारांवरती दाखल करण्यात आलेला ३५३ चा गुन्हा ताबडतोब गृहमंत्रालयाला आदेश पारित करुन गुन्हा रद्द करण्यात यावे प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन. पत्रकार विश्राम गृह प्रेस कॉ्न्फरन्स हॉल बांधण्यात यावे पत्रकारांना टोल माफी. रेल्वे प्रवास मोफत करावेत.शासनाच्या घरकुल योजनेचा या सह इतर शासनाच्या योजने मध्ये पत्रकारांचा समावेश करण्यात यावा ५८ वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शन योजना सुरु करण्यात यावी अशासकीय समित्या.तसेच जिल्हा नियोजन समिती.पोलीस दक्षात समिती.शांतता समिती.आरोग्य समिती शालेय व्यवस्थापन. इतर सर्व शासकीय समिती, महामंडळ समिती.

शासनाच्या समिती नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्ट मध्ये.पत्रकारांना प्राधान्यने नियुक्ती करण्यात यावे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांना बंधू आणि भगिनीं हे सतत भ्रष्ट अधिकारी कर्मचारी व इतर भ्रष्टाचार उघड करणारा वर्ग राज्यात निर्भिड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर अवैध व्यावसायिक. वाळू माफिया. गैन खनिज माफिया. भ्रष्ट अधिकारी कर्मचारी व इतर बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तीकडून अथवा त्यांच्या गाव गुंडा कडून हल्ले केले जातात अथवा पत्रकारांना खोटे गुन्ह्या मध्ये अडकवून विनाकारण त्रास दिला जातो त्यामूळे निर्भिड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना सबंधीत पोलीस ठाण्याकडून पोलीस संरक्षण देण्यात यावे अश्या अनेक पत्रकारांच्या १७ प्रकारच्या मागण्याचे देण्यात आलेले निवेदन मुख्यमंत्री यांनी तत्काळ मंजूर करण्यात यावे असे निवेदानाद्वारे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे यवतमाळ उपाध्यक्ष अनिल पुल्लजवार.शेखर सिडाम.निलेश यमसंनवार.नंदू आर्गुलवार. रामेश्वर पुदरवार. मोबिन तिघाले. संदीप सुरपाम. हनुमान लसंते या सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांनी पत्रकारांच्या विविध मागण्याचे निवेदन केले सादर.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved