Breaking News

राष्ट्रीय विश्वगामी राळेगाव,तालुका संघाच्या वतीने राळेगाव तहसिलदार यांना दिले निवेदन.

रा.वि.राळेगाव तालुका पत्रकार संघ, शेतकरी संघ, कामगार संघाच्या वतीने निवेदन सादर

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-यवतमाळ जिल्यातील तालुका राळेगाव येथे आज दिनांक १४/७/२३ रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.संतोषजी निकम,यांच्या आदेशाने,मा.वैभव पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, यवतमाळ जिल्ह्या अध्यक्ष मा. रत्नपालजी डोफे,मा संजय कारवटकर जिल्हा उपाध्यक्ष ,विनोद माहुरे रा.वि.राळेगाव तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष, सम्यक मैसकर जिल्हाध्यक्ष रा‌.वि. कामगार संघटना, उमेश कांबळे, शशिम कांबळे सचिव,मिलींद धनविर,गणेश हिवरकर, सुधाकरराव दांडेकर,यांच्या उपस्थितीत.

राष्ट्रीय विश्वगामी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या व राष्ट्रीय विश्वगामी विंगच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना सर्व पत्रकारांच्या १७ मागण्या असलेले निवेदन राळेगावचे तहसिलदार अमित भोईटे यांच्या मार्फत देण्यात आले. निर्भिडपणे पत्रकाराकीता करणाऱ्या पत्रकारांवर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्या कडुन भा.दं.वि.कलम ३५३ चा दुरुपयोग करण्यात येतो,तसेच पत्रकार बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करुन लोकशाहीचा चौथास्तंभ असणाऱ्या प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे‌

या कलमाचा धाक दाखवुन निर्भिडपणे पत्रकारिता करण्यापासुन रोखले जाते त्यामुळे भादंवि कलम ३५३ मधून पत्रकारांना वगळण्यात यावे व राज्यात काही पत्रकारांना ३५३सारखे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. ते तात्काळ मागे घेण्यात यावे, पत्रकार प्रवास करीत असलेल्या वाहनांना राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफी मिळावी,तसेच रेल्वे मध्ये पत्रकारांना मोफत प्रवेश मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे महाराष्ट शासनाकडुन पाठपूरावा करण्यात यावा,शासनाने ६० वर्ष पुर्ण झाल्यावर सर्व निकष तपासुन जेष्ट पत्रकारांना अधिस्वीकृती दिली होती आता सन्मानाचा लाभ देतांना जाचक अटी टाकुन जेष्ट पत्रकारांना सन्मानाच्या लाभापासून वंचित ठेवल्या जात आहे.

याबाबत शासनाने लक्ष घालुन जेष्ट पत्रकारांना शासकिय योजनेचा लाभ द्यावा.राज्यात निर्भिडपणे पत्रकाराकीता करनाऱ्या पत्रकारांवर अवैध व्यावसायिक ,वाळु माफिया,गौण खणिज माफीया,भ्रष्ट अधिकारी कर्मचारी व ईतर बेकायदेशीर काम करणार्यां व्यक्तीकडुन अथवा त्यांच्या गावगुंडानकडुन हल्ले केले जातात अथवा पत्रकारांना खोटे गुन्ह्यांमध्ये अडकवुन त्रास दिल्या जातो.

त्यामुळे निर्भिडपणे पत्रकाराकीता करणार्यां पत्रकारांना संबधित पोलिस ठाण्याकडुन पोलिस संरक्षण मिळावे.याकरीता संपुर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्यामुळे परवानगी देण्यात यावी.व अश्या अनेक मागण्याचे निवेदन महाराष्ट राज्याचे मा.मुख्यमंत्री साहेब यांना राळेगावचे तहसिलदार अमित भोईटे यांच्या मार्फत देण्यात आले. यावेळी प्रशांत भगत , चेतन वर्मा, सागर हिकरे,भिमरावजी वागदे,अजय जुमनाके, शंकर पंधरे,देविदास कोल्हे,लक्ष्मन डफरे,गणेश बावणे,व इतर विंगच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved