जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-युवासेना प्रमुख आदित्य उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई,युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेशदादा कदम,युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षलदादा काकडे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम,युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे,संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या हस्ते युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार सप्ताह शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे करण्यात आला.

त्यावेळी नंदनी फाळके यां विद्यार्थीनीचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच सुजल पावडे व अनुश्री झुरके यां विद्याथ्यांर्थाचा पालकांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, चिमूर विधानसभा प्रमुख दादा दहिकर,विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले,युवासेना जिल्हा समनव्यक दिनेश यादव,ज्येष्ठ शिवसैनिक बंडूजी डाखरे गुरुजी,शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम, शहर संघटक किशोर टिपले,अनिल गाडगे,अतुल नांदे,उपतालुका प्रमुख सागर पिपळशेडे, उपशहर प्रमुख मनीष दोहतरे, कपिल धकाते उपस्थित होते.वरोरा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सत्काराची जबाबदारी युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे, उपतालुका प्रमुख अक्षय झिले,युवती सेना तालुका प्रमुख तेजस्विनी हनवते यांच्या कडे देण्यात आली.
ज्वाला समाचार सच का सामना