सात तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी यांचा समावेश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या नेतृत्वात सोमवार ला दुपारी एक वाजता मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविणे सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी हुतात्मा स्मारक येथुन निघून अंगणवाडी ताईचा मोर्चा थेट चिमूर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकणार आहे.
कोरोना काळात कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देणाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेणाऱ्या अंगणवाडी ताई महागाईने भरडल्या आहेत त्यांच्या कडे कोनी लक्ष द्यायला तयार नाहीत त्यामुळे सोमवार ला निराश अंगणवाडी कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मागण्यांसाठी मोर्चा आयोजीत केला आहे
सदर मोर्च्यात मोठ्या संख्येने अंगणवाडी ताईंनी सहभागी व्हावे असे आव्वाहन :- माधुरी रमेश विर चिमुर, प्रभा विश्वनाथ चामटकर नागभीड, लता राजु देवगडे भद्रावती, ललिता सोनुले मुल,विद्या वारजुकर ब्रम्हपुरी,कमल बारसागडे सिंदेवाही,अन्नपुर्णा हिरादेवे वरोरा यांनी केले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना