जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि.23 जून : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात कायदेविषयक शिबिराचे आयोजन दि.20 जून रोजी सम्राट अशोक बुद्धविहार सभागृह, कृष्णा नगर, मुल रोड, चंद्रपूर येथे करण्यात आले होते.
या कायदेविषयक शिबिराप्रसंगी वकील वैशाली टोंगे, महेंद्र असरेट व प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुमित जोशी उपस्थित होते. यावेळी प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुमित जोशी यांनी बालकांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण व त्याचे महत्त्व स्पष्ट केले. वकील वैशाली टोंगे यांनी बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार 2009 या कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर महेंद्र असरेट यांनी माहितीचा अधिकार कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मोठया संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना